भाजपमध्ये संघटनात्मक बदल, प्रकाश जावडेकरांवर दिली मोठी जबाबदारी…
BJP News : काही राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागलं आहे. त्यामध्ये नुकतच भाजपने पंजाब, तेलंगाणा, झारखंडसह चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. त्यामध्ये राज्यातील केंद्रातील माजी मंत्री राहिलेले भाजप नेते प्रकाश जावडेकरांवर देखील महत्त्वाची जाबाबदारी देण्यात आली आहे. ( Organizational changes Prakasha Jawadekar got resposebility in BJP for upcoming elections)
आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं मिळवणं म्हणजे प्रगती; अंधारेंची गोर्हेंवर जळजळीत टीका
भाजपच्या या संघटनात्मक बदलांमध्ये राज्यातील केंद्रातील माजी मंत्री राहिलेले भाजप नेते प्रकाश जावडेकरांवर तेलंगाणाच्या निवडणूक प्रभारीपदाची जाबाबदारी देण्यीत आली आहे. जावडेकरांसह भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रकाश जावडेकरांना दिलेली ही जाबाबदारी महाराष्ट्रासाठी मोठा बदल मानला जात आहे.
Happy Birthday MS Dhoni: वाढदिवसाच्या निमित्त व्हायरल झालेले धोनीचे फनी व्हिडीओ
दरम्यान ज्या राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मिर, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. पद सोडणाऱ्या अनेक अध्यक्षांना मोदी मंत्रिमंडळात एन्ट्री मिळण्याचीही शक्यता असल्याची माहिती आहे. गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. पाटील लोकसभेचे खासदारही आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेणेही सोपे राहिल.तर पाटील हे पंतप्रधान मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
पाटील यांच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा केंद्रीय मंत्री बनू शकतात. शर्मा यांना दिल्लीत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांच्या जागी कोण हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात विलंब होत आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, कैलाश विजयवर्गीय, सुमेर सिंह सोलंकी यांची नावे चर्चेत आहेत.
पक्षातील बदलांसह मोदी कॅबिनेटमध्येही बदलांच्या चर्चा जोरात सुरू आहेत. भाजप नेते जी. किशन रेड्डी यांना तेलंगाणा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. रेड्डी हे आतापर्यंत पर्यटन मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते.