- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अजितदादांचा ‘पॉवर’गेम; भाजपसह शिंदेंच्या शिलेदारांना बसला फटका
NCP MLA Portfolio Distribution : खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे. याचे कारण शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादांना […]
-
मंगलप्रभात लोढांना झटका; महिला बाल कल्याण खातं राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंकडे
Cabinet Expansion : अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची आहेत, याबाबतची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये आता महिला बाल कल्याण मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढांना झटका बसला आहे. कारण लोढांकडे असलेलं महिला […]
-
‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार
Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी जे केले त्याला बेईमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नव्हे तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी होते तेव्हा कुटनीती वापरावी लागते, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार […]
-
सुप्रीम कोर्टाच्या नोटीसीवर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच यावर…
Rahul Narwekar On Supreme Court Notice : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावी, अशी नोटीस बजावण्यात येत आहे असे सरन्यायाधीश डी. […]
-
खातेवाटपाची यादी जाहीर; अर्थ खातं अजितदादांकडे, कोणतं खातं कोणाकडे? वाचा…
खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या होत्या. पण या मॅरेथॉन बैठकांमधील निष्फळ ठरली होती. अखेर दिल्लीवारी करुन आल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. राज्य सरकारकडून खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन […]
-
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार घटले, विरोधी पक्षनेता कोण होणार? पटोलेंनी दिलं थेट उत्तर
Nana Patole : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले आहे. पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता […]









