- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना दणका; मुश्रीफ प्रकरणात चौकशीचे आदेश
Hasan Mushrif vs Kirit Somaiya : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कोल्हापुरात दाखल असलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी न्यायालयात दाद मागितली होती. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना जेरीस आणणाऱ्या […]
-
Bhaskar Jadhav : आज माझ्यावर राग कमी दिसतोय; नार्वेकरांना उद्देशून जाधवांचे विधान
Bhaskar Jadhav On Rahul Narwekar : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन […]
-
Anil Parab : ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदम यांना अटक, सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. […]
-
शेतकरी हीच आमची जात…जातीच्या राजकारणावरुन अजित पवार सभागृहात आक्रमक
मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात […]
-
Sachin Sawant : घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न
“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे.” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही योजना जाहीर केल्या आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. […]
-
ती जात नाही तर फक्त वर्गवारी; गदारोळानंतर कृषी विभागाला सूचले शहाणपण
मुंबई : खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत या प्रकाराचा जाब विचारला आहे. अजित पवार यांनी शेतकरी हीच आमची जात आहे, असे सांगत सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकारावरुन उठलेल्या गदारोळानंतर आता कृषी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा : ई पॉस मशीनवरुन […]










