शिळ्या अन्नातून विषबाधा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
अहमदनगर : आहार योग्य असेल तर शरीरासाठी उत्तम अन्यथा शिळे अन्न जीवघेणे देखील ठरु शकते असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. तालुक्यातील टाकळी काझी येथे एकाच कुटुंबातील तीन मुलांना अन्नातून विषबाधा झाली. त्यातील दोन बालकांचा मृत्यू झाला असून एक मुलावर उपचार सुरू आहेत. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आधिक महिती अशी की, टाकळी काझी येथील म्हस्के यांच्या घरी गुरुवारी (ता. ९) रोजी घरातील लहान मुलांनी बुधवारी फ्रिजमध्ये ठेवलेला संत्र्याचा ज्यूस पिला. त्यापुर्वी बुधवारी (ता. ८) रोजी या लहान मुलांनी मांसाहार केला होता.
दरम्यान ज्यूस पिल्यानंतर या मुलांना त्रास होऊ लागला. संबधीत लहान मुलांना अहमदनगरमधील दवाखान्यात घेऊन जात असताना शिवराज बापू म्हस्के (वय साडेचार) याचा मृत्यू झाला. तर स्वराज बापू म्हस्के याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर सार्थक भाऊसाहेब म्हस्के (वय १४) याच्यावर उपचार सुरू आहेत. विषबाधेतून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.
Old Pension Scheme : राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा, घोषणा करून निवडणूका जिंकता येतील पण…