दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार, सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार, सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट

मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या नूकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या परिस्थितीत दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन हे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ठामपणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं.

‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित पवारांचा संतप्त सवाल

मंत्री मुनगंटीवर म्हणाले, आमचं सरकार संवेदनशील आहे. या विषयांत विरोधकांनी सहकार्य करावं. जिथं नूकसान झालंय तिथं भरपाई देणार असून दोन दिवसांत पंचनामे् पूर्ण होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच राज्यातील काही विषय राजकारणाविरहीत असतात. ते पोटाशी संबंधित असतात. सुदैवाने राज्यात गंभीर आणि संवेदनशील सरकार असून चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम

दरम्यान, राज्यात सध्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून कर्मचाऱ्यांनी आता संप मागे घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्वच नेत्यांनी संप मागे घेण्यासाठी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नी विधानसभेत विरोधकांकडून मदत मिळण्याची मागणी सातत्याने जोर धरत असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहचली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय. तर कर्मचारी संपावर गेले तरी पंचनामे होणारचं, असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube