देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती आज साईनगरीत, शिर्डीत मोठा बंदोबस्त तैनात…
देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती आज साईनगरीत दाखल होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डीमध्ये येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच शिर्डी दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून शिर्डी शहर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. राष्ट्रपती साई मंदिरात साई समाधीचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांचे आज शुक्रवारी ७ जुलै श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे.
Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले
त्यानंतर साईमंदिरात मध्यान्ह आरतीला त्या उपस्थित राहातील. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
व्यवसायावरुन टीका म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, राऊतांच्या टीकेवर उदय सामंताचं प्रत्युत्तर…
त्यानंतर साईबाबांच्या द्वारकामाईत जाऊन त्या दर्शन घेतील व साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात प प्रसाद ग्रहन करतील. राष्ट्रपती मुर्मू यांच्या शिर्डी दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरीषद यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महानिरीक्षक, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आदीसह राज्यातील विविध ठिकाणांहून पोलिसांचा फौजफाटा यासह राज्य राखीव पोलिस दल, क्यु.आर.टी. पथक, बॉम्ब शोधक पथक यांचा समावेश आहे.