दाढी वाढवली.., प्रसादावर दिवस काढले, राजस्थानातील खेड्यातून सचिन घायवळला पोलिसांनी कस उचललं?
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, अपहरण मारामारी यासारखे अनेक गुन्हे सचिन घायवळवर दाखल होते. मागील काही दिवसांपासून तो फरार होता.
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा (Pune) भाऊ सचिन घायवळला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतलं. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही बंधूंच्या पुण्यातील कारवायामुळं राज्य आणि देश पातळीवर पुण्याचं नाव बदमान झाल्याची चर्चा होती. सचिन घायवळला राजस्थानातून पकडण्यात यश आल्यामुळं आता या प्रकरणातील त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sachin Ghaywal : सचिन घायवळला राजस्थानातून अटक; अनेक महिन्यांपासून होता फरार
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, अपहरण मारामारी यासारखे अनेक गुन्हे सचिन घायवळवर दाखल होते. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला पुणे पोलिसांनी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. सचिन घायवळला पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.3) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं असून, गुरुवारी (दि.4) पुणे न्यायालयात हजर केलं. यावेळी सचिन घायवळला न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिन घायवळनं केलं होतं वेषांतर
अटकेपासून वाचण्यासाठी सचिन घायवळ हा स्वतःची ओळख लपवून राजस्थानमध्ये राहत होता. त्यानं आपली ओळख पटू नये म्हणून दाढी आणि डोक्यावरील केस वाढवून पूर्णपणे वेषांतर केलं होतं. सीकरमधील एका ठिकाणी तो कोणालाही संशय येऊ नये म्हणून कोणाच्याही संपर्कात न राहता अगदी एकटाच वास्तव्य करत होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सचिनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं. त्याचं शेवटचं लोकेशन राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात आढळलं. या माहितीची पुष्टी होताच पुणे पोलिसांचं अनुभवी पथक सीकरच्या दिशेनं रवाना झालं. या पथकातील कर्मचाऱ्यांनी सचिन घायवळला आधी पाहिलं असल्यानं त्यांनी त्याला लगेच ओळखल.
सचिन घायवळ निलेशच्या संपर्कात होता का?
सीकरमधील संबंधित भागात एक महाराष्ट्रातील माणूस राहत आहे. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी राजस्थानमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचत बुधवारी रात्री 10.30 वाजता सचिन घायवळला ताब्यात घेतलं. सचिनचा सख्खा भाऊ आणि कुख्यात टोळीचा मुख्य म्होरक्या निलेश घायवळ हा सध्या देशाबाहेर फरार आहे. सचिन घायवळ फरार असताना निलेशच्या संपर्कात होता का? आणि तो परदेशातून गँग चालवत होता का? याचा तपास पोलीस करणार आहेत, असं पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितलं.