विखे पाटलांनी वाचला आतापर्यंत पूर्ण झालेल्या मागण्यांचा पाढा; जरांगे आंदोलन मागे घेणार?
Radhakishna Vikhe Patil Manoj Jarange मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलं आहे.
Radhakishna Vikhe Patil read list of demands fulfilled Will Jarange withdraw Hunger Strike For Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून आपण कडक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलं आहे. यावेळी विखे यांनी जरांगेंच्या मागण्यावर आतापर्यंत झालेल्या कारवाईची माहिती देत पुढील कारवाई वेगाने करण्याचं अश्वासन दिलं. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
मराठा समाजाच्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू आहे. हैदराबा गॅजेट देतानी काही अडचणी होत्या त्या आम्ही दुरकरण्याचा काम करत आहोत. संभाजी नगर विभागीय आयुक्तांनी SOP तयार केली होती. त्यावर आम्ही आज चर्चा केली आहे.
तसेच आंदोलनामध्ये जे 668 पैकी 567 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत तर काही प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. 90 टक्के गुन्हे आम्ही मागे घेतले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात शहीद झाले त्यांना आम्ही 100 टक्के न्या दिला आहे.
आता EWS जाऊन ECBC आलं आहे. सातारा गॅझेटचा अभ्यास पुर्ण झाला आहे. त्यामुळे हे काम झालं आहे. आणखी सुरू आहे. तरी देखील जरांगे यांना सरकारकडून काय आपेक्षा आहेत? ते त्यांनी सांगावं. असं म्हणत त्यांनी जरांगे यांना अश्वासन दिलं. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.