Rain Update : घराबाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : घराबाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामध्ये आता येत्या 24 तासांत राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ( Rain Forecast by IMD for upcoming 24 hours in Maharashtra)

जेजुरी हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या; शेतातच वाहिले रक्ताचे पाट

हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये कोकणात पावसाचा रेड अलर्ट तर सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

72 Hoorain’ लवकरच बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार? पहिल्याच दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

दरम्यान कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये पालघर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर तर विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान सातारा आणि ठाणे या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी मान्सून 8 जुलैच्या आधीच दाखल झाल्याने दिलासा मिळालायं. राज्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्ली उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तरेतील या राज्यांत झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube