2024 साठी मनसे स्वबळावर? तयारी सुरु; पदाधिकाऱ्यांची बैठक

2024 साठी मनसे स्वबळावर? तयारी सुरु; पदाधिकाऱ्यांची बैठक

Raj Thackeray : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकांंचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. नूकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनीही आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील लोकसभा स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

World Cup 2023: भारताचा दिग्गज खेळाडू देणार अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये धडे

राज्यात एकीकडे सत्ताधारी भाजप-शिंदे-राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांची महायुती असून दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या पक्षासोबत युती करणार की स्वबळावर निवडणुका लढवणार? याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे.

सुजीत पाटकरने ईडीसमोर घेतले संजय राऊतांचे नाव; 32 कोटी 60 लाखांच्या कॉन्ट्रॅक्टचा फायदा झाल्याचा दावा

मागील इतिहास पाहता अद्याप तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणत्याही पक्षासोबत युती करुन निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे आत्ताही महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावरच निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं जातंयं.

WC 1996 : श्रीलंकेकडून भारताचा पराभव प्रेक्षकांच्या जिव्हारी; गोंधळ घालत पेटवलं होतं स्टेडियम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपूर्वीच पदाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेण्याबाबतचे निर्देश दिले होतं. त्यानंतर आता तत्काळ बैठक घेण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत राज्यात नेहमीच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवून मराठी माणसांना न्याय देण्याच प्रयत्न केल्याचं एकूण चित्र आहे. आत्तापर्यंत टोल आंदोलन, सत्ताधारी मोदींना विरोध, काँग्रेसचं भ्रष्टाचार प्रकरण, आणि हिंदुत्व अशा मुद्द्यांवरुन राज ठाकरे नेहमीच सडेतोडपणे भाष्य करीत असतात.

Bombay High Court मध्ये जिल्हा न्यायाधीशपदांच्या 8 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,94,660 रुपये पगार

राजकारणात अनेकदा राज ठाकरे यांनी भूमिका बदलल्याचं सांगितलं जातं. 2014 साली निवडणुकीनंतर पुन्हा निवडणुका लढवणार नसल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. तसेच राष्ट्रीय पक्षाने विधानसभा लढवू नये, आणइ प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढवून नयेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर 2019 साली पार पडलेल्या निवडणुकीत मनसेने निवडणूक लढवली नसल्याचं दिसून आलं.

आता 2024 च्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंकडून जोरदार हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सभेतून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन आता मात्र, राज ठाकरे यांनीही सर्वच पक्षांविरोधात दंड थोपटल्याचं पाहायाल मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे उमेदवार उभे राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube