Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला…

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला…

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून याआधी असा महाराष्ट्र कधी नव्हता. कुठला आमदार कुठल्या पक्षात काहीच कळत नाही. पूर्वी आमने-सामने या गोष्टी होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलंय.

राज ठाकरे म्हणाले, मला कळतच नव्हते कोण कोणत्या पक्षातला. सध्या कोणी आमदार आला की कुठल्या पक्षाचा हे विचारावे लागते. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Aaditya Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांची दिशाभूल…

तसेच मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा सांगितल्यास म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो आहे, असं प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Maharashtra Shaheer : मराठी भाषा दिनीच ‘बहरला हा मधुमास’

त्याचप्रमाणे सध्या वर्तमानपत्र मीच वाचत नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे. मराठी नियतकालिके बंद पडत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात वाचन वाढवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Adani Share Price : अदानीच्या घसरणीचा LIC नंतर आता SBI लाही फटका, गुंतवणूकदार अडचणीत

दरम्यान, राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे त्यावर येत्या गुडीपाडव्याच्या बोलणार असून, त्या दिवशी संपूर्ण सिनेमाचं दाखवणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube