वर दोन गुजराती बसले आहेत तर… व्यापारी लोक आहात व्यापार करा ; जैन समाजाच्या शिष्टमंडळाला राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray On Jire Top Controversy : काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची
Raj Thackeray On Jire Top Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची काही दिवसांपूर्वी मालाड येथे घटना घडल्याने संपूर्ण राज्यातून शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आज (26 जून) मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत राज ठाकरेंकडे लेखी माफीनामा सुपूर्द केला.
मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जैन शिष्टमंडळाला सांगितलं.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली. या भेटीनंतर मालाडमधील तो वाद आता शांततेने मिटल्याचे चित्र असून, मनसेकडून मराठी अस्मितेबाबतची भूमिका नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली आहे.
“राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन… pic.twitter.com/XcPNckUHQ2
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 26, 2026
पुन्हा ‘गुलाबी’ रंगाची जादू; ‘साडी’ गाण्याचा टीझर प्रदर्शित!-
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?
तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमची डोके भडकवली जात आहे. आमची डोके भडकली तर काय होईल. तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका आणि येऊन गेली तर पुन्हा काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात. या ठिकाणी इतकी वर्ष गुजराती लोक राहत आहे. यापूर्वी असं कधीच झाले नाही. गेल्या 10-12 वर्षात असं होत आहे. तुम्हाला काय वाटत आहे, वर दोन गुजराती बसले आहेत तर काही करु. व्यापारी लोक आहात व्यापार करा आणि शांत जगा. आजपर्यंत कोणी अडवले आहे का? असं राज ठाकरे जैन शिष्टमंडळाशी म्हणाले.