समाज कल्याणच्या पैशांबाबत कायदा करा; लाडक्या बहिणीसाठी वळवल्याचा आरोप करत आठवलेंची मागणी

Ramdas Athawale Ladki Bahin रामदास आठवले यांनी लाडकी बहिण योजनेसाठी सामाज कल्याण विभागाचे पैसे वळवल्याच्या आरोपांना दुजोरा दिला.

Ramdas Athawale Ladki Bahin

Ramdas Athawale demands for law regarding Social Welfare funds after alleging diversion of funds for ‘Ladki Bahin’ scheme : राज्यामध्ये 2024 च्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने मध्यप्रदेशातील योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली होती. अद्यापही ही योजना सुरू आहे. मात्र यामुळे समाज कल्याण विभागाच्या निधीवर भार पडत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच इतरही खात्यातून हा आरोप होत आहे.

7 महिन्यांनंतर नितीन नबीन यांच्या नव्या टीमची घोषणा, भारती पवार, तावडे कुणा-कुणाला मिळाली संधी

दरम्यान यावर केंद्रीय राज्यमंत्री समाजिक न्याय रामदास आठवले यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिला. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या पैशांसाठी कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. ते लेट्सअप मराठीने घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

छत्रपती संभाजीनगरात दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; ढाब्यावर कुक, वेटर म्हणून करत होते काम

आठवले यांना लाडकी बहिण योजनेसाठी सामाज कल्याण विभागाचे पैसे वळवले जात असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की, लाडकी बहिण योजनेसाठी सामाज कल्याण विभागाचे पैसे वळवले जात आहेत हे खरं आहे. तसेच लाडक्या बहिणीमध्ये आपल्या देखील बहिणी आहेत. सरकारने काही अडचणींमुळे लाडकी बहिणसाठी समाज कल्याणचे पैसे वळवले असतील तरी त्यांनी ते परत द्यावेत.

राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक; ट्रॅफिक, रस्ते आणि पेपरफुटीचे मुद्दे चर्चेत

कर्नाटक आणि इतर काही राज्यांमध्ये समाज कल्याणचे पैसे वळवू नये यासाठी कायदा आहे. त्याच पद्धतीचा कायदा महाराष्ट्रात असावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. तसेच आता पर्यंत वळवलेले पैस परत करण्याची देखील मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं यावेळी आठवले म्हणाले.

follow us