देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर..’हे’ गीत असावं राष्ट्रगीत..रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर..’हे’ गीत असावं राष्ट्रगीत..रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Ramgiri Maharaj On Rashtragit : धर्मगुरू रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीत आणि भारताचे महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्यावर वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. (Ramgiri Maharaj ) जन, गण, मन याऐवजी वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत असले पाहिजे, असं रामगिरी महाराज यांनी म्हटलं आहे. भविष्यात वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हावे यासाठीही संघर्ष करावा लागेल असंही ते म्हणाले आहेत.

‘संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही’, महंत रामगिरी महाराजांसमोर शिंदेंची ग्वाही

रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात ६० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले होते. तसंच, रामगिरी महाराज म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणे ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्या समर्थनार्थ गायले होते. हे राष्ट्राला उद्देशून कधीच नव्हते.

भविष्यातही यासाठी लढू

रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणे 1911 मध्ये कलकत्ता येथे गायले होते, जेव्हा भारत स्वतंत्र देश नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज यांच्या समर्थनार्थ हे गाणे गायलं होतं. जॉर्ज पंचम कोण होता? तो ब्रिटिश राजा होता आणि तो भारतीयांवर अत्याचार करत होता. राष्ट्रगीत हे भारतातील लोकांसाठी नाही. त्यामुळे भविष्यात यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे मातरम हे आपलं राष्ट्रगीत असलं पाहिजे,असं वादग्रस्त वक्तव्य धर्मगुरू रामगिरी महाराज यांनी केलं आहे.

रामगिरी महाराज कोण आहेत?

रामगिरी महाराजांना जवळून ओळखणारे रामगिरी यांचे खरे नाव सुरेश रामकृष्ण राणे असल्याचं सांगतात. त्यांचा जन्म जळगाव येथे झाला आणि त्याच परिसरात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1988 मध्ये, जेव्हा ते नववीत शिक्षण घेत असताना त्यांनी स्वाध्याय केंद्रात प्रवेश घेतला आणि पवित्र गीतेचा अभ्यास सुरू केला. दहावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, नंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि 2009 मध्ये त्यांनी नारायणगिरी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. नारायणगिरी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सरला बेटाचे द्रष्टेपद स्वीकारलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube