युती-आघाडीच्या चर्चांनी 15 वर्ष नुकसान केलं… आता स्वतंत्र लढणार! तुपकरांचा ‘आर या पार’चा नारा
बुलढाणा : मागील 15 वर्षांपासूनच्या युती आणि आघाडीच्या चर्चांमध्ये आमचे नुकसान झाले. पण यंदा आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मतदारसंघातील लोकांचा मला पाठिंबा आहे. लोकवर्णणीतून लोक मला लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मदत करत आहेत, त्यामुळे आता माघार नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sangathan) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे. (leader of Swabhimani Shetkari Sangathan Ravikant Tupkar will contest independent election from Buldhana Lok Sabha constituency)
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची कोणताही चर्चा झालेली नाही. हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे असून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
मी आघाडी सोबत पण आघाडी माझ्यासोबत नाहीच; मविआच्या बैठकीत असं का म्हणाले आंबेडकर?
या पार्श्वभूमीवर बोलताना तुपकर म्हणाले, मात्र मागील अनेक वर्षांपासून आम्ही सोयाबिन, कापसाचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. हेच प्रश्न मांडण्यासाठी आपण सभागृहात जावे अशी शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र 15 वर्षांपासून युती आणि आघाडीच्या राजकारणात, चर्चेने आमचे नुकसान केले. यापूर्वीही आपण दोनवेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात, दोनवेळा चिखली विधानसभा मतदारसंघात तयारी केली होती. मात्र तडजोडीमुळे आपल्याला माघार घ्यावी लागली.
मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा! चहल, सुधाकर शिंदेंची बदली करा, वडेट्टीवारांची मागणी
पण आता मतदारसंघातील लोकांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या चर्चांमध्ये न पडता स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. लोकवर्णणीतून लोक मला लोकसभा निवडणुकीसाठी मदत करत आहेत, लोकांचीच इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी, त्यानुसार आता मैदानात उतरलो आहे, यात्रा, सभा, मेळावे अशा गोष्टी सुरुच आहेत, आता निवडणुकीत जीत हो या हार… पण माघार नाही, असा इरादा तुपकर यांनी बोलून दाखविला आहे.