कृषी सहाय्यक पदांसाठी लवकरच भरती, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे संकेत

कृषी सहाय्यक पदांसाठी लवकरच भरती, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे संकेत

मुंबई : कृषी सहाय्यक पदासाठी अर्ज भरण्याऱ्या उमेदवारांसाठी सकारात्मक बातमी समोर आलीय. या पदांसाठी लवकरच भरती निघणार असल्याचे संकेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. कृषी सहाय्यकांचे रिक्त पदे भरण्याची कारवाई पुढील 15 दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिलीय.

विक्रम काळे पायऱ्यांवर घोषणा देत होते, केसरकर आले आणि काळेंना सुनावून गेले, काय घडलं वाचा

दरम्यान, विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण कृषी सहाय्यकपदांच्या रिक्त पदाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तरात 15 दिवसांत कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.

कृषी विभागात अनेक रिक्त पदे असून या पदांच्या आकृतीबंधाचा आराखडा शेवटच्या टप्प्यात आला आहे. आराखड्याचं काम संपल्यानंतर कृषी विभागांत रिक्त पदांच्या भरतीबाबत निर्णय होणार असल्याचे संकेत कृषीमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले आहेत.

विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ, निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचं म्हणत केला सभात्याग…

सत्तार म्हणाले, कृषी विभागात कृषी सहायकांची 11 हजार 599 पदे मंजूर आहेत. फेब्रुवारी-2023 अखेरपर्यंत 9 हजार 484 पदे भरलेली आहेत तर 2 हजार 115 पदे रिक्त असल्याची माहिती आहे.

मंजूर पदांचा विचार केल्यास रिक्त पदांचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे. रिक्त पदांचं प्रमाण 18 टक्क्यांवर आहे.
कोरोना काळात वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले.

दरम्यान, सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी सहायकांची एकूण 1439 पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube