महायुतीमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत?, शरद पवार गटाच्या आमदाराचा मोठा दावा

महायुतीमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत?, शरद पवार गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Mahayuti Alliance Government : महायुती सरकारला स्थापन होऊन आता (Government) केवळ सात महिने झालेत. मात्र, या काळात अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. या आरोपांचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला बसू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. तसंच, स्वच्छ आणि नव्या चेहऱ्यांना फडणवीस मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची चर्चा आहे.

आता राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा थेट दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. “काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. बघुया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..!”, असंही ते म्हणालेत.

Video : त्या मुद्द्यांची मला खोलवर समज नव्हती; ओबीसी मेळाव्यात राहुल गांधी नक्की काय म्हणाले?

महायुतीमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा नेहमी सुरु असतात. हे सरकार स्थापन झालं तेव्हा देखील शीतयुद्ध बघायला मिळालं होतं. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडायला तयार नव्हतं. तसंच, त्यांनी काही महत्त्वाच्या खात्यांची देखील मागणी केली होती. पण, त्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकल्या नाहीत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा दावादेखील सोडावा लागला होता. तसंच, सत्ता स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेकदा अर्थमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडं निधी वाटपाबाबत तक्रार केल्याची चर्चा असते. तर नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याची तक्रार भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा आहे. त्यातूनच नगरविकास विभागाची कोणतीही फाईल आपल्या स्वाक्षरीशिवाय पुढे सरकरणार नाही, असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या