राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव टाली, रुपाली ठोंबरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं.

  • Written By: Published:
Untitled Design 59

Rupali Thombre’s social media post is in the news : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अशोक खरातवर करण्यात आला आहे.

या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हस्ते खरातची पाद्यपूजा करण्यात आल्याचं दिसत आहे. तसेच दोघांचे विविध कार्यक्रमांत फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रुपाली चाकणकर यांच्या राणीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर, त्यांच्या पक्षातीलच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट करत टीकेची धार अधिक तीव्र केली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली… अशी पोस्ट त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं.

 

तपासावर प्रभाव पडू नये यासाठी रुपाली चाकणकर यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच या प्रकरणात 58 व्हिडिओ आल्याचा दावा करत, एवढ्या महिलांवर अत्याचार झाला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याबाबत आपण सुनेत्रा पवार यांच्याही कानावर हा विषय घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजीनामा न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

सर्वसामान्यांची चिंता वाढली, गॅसनंतर आता पेट्रोलचा भडका; स्पीड आणि पॉवर पेट्रोल 113 रुपयांवर

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात यांच्याविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 18 मार्च रोजी पहाटे तिच्या सुमारास गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. अशोक हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वार्षांत तो कोस्मोलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळवत होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्यकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र आता त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने राज्यभरात मोठं राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण केलं आहे.

follow us