आमच्या खासदारांवर शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत अहिरांकडून वेलकम; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde On Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर अंतगर्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील सहा खासदार फोडल्यानंतर

Eknath Shinde On Uddhav Thackeray

Eknath Shinde On Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर अंतगर्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील सहा खासदार फोडल्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आमच्या सहा खासदारांवर शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत वेलकमसाठी सचिन अहिर आले आहेत असा टोला देखील लावला आहे.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत (Mumbai) त्यांच्या स्वागतासाठी अहिर (Sachin Ahir) आले आहेत. एकनाथ शिंदे जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही. मी काही खुलासा करणार नाही पण जे काही केले ते फुलप्रूफ आहे असं या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सचिन अहिर ग्रासरुटचा कार्यकर्ता आहे. आज त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी (Deputy Chairman of Legislative Council) महायुतीतून फार्म भरला आहे. उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड देखील होईल. ते फक्त मुंबईच नाही तर आता उपसभापती म्हणून महाराष्ट्राचे काम करतील. सचिन अहिर शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

लढा थांबणार नाही! नाशिक–पुणे रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे-

माझा शपथविधी देखील 30 तारखेलाच झाला

आम्ही 2022 मध्ये उठाव केला. आज 30 तारीख आहे तेव्हा देखील याच तारखेला माझा शपथविधी झाला होता हा योगायोग आहे. मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो दोघांनी टीम म्हणून काम केले. महाविकास आघाडीच्यावेळी विकासकामात थोडा बॅकलॉग होता पण महायुतीच्या काळात महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात धावू लागला असल्याची देखील आठवण एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना करुन दिली.

follow us