बॉलिवूडमध्ये खळबळ! सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी

Saif Ali Khan Death Threat: अभिनेता सैफ अली खान यालाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Saif Ali Khan Death Threat: अभिनेता सैफ अली खान यालाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Saif Ali Khan Death Threat: बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. अभिनेता सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर टायगर श्रॉफवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता अभिनेता सैफ अली खान यालाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

भारताला अमेरिकेतून येणार LPG ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मीडल इस्टमधील अवलंबित्व कमी होणार !

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याला झिशान अख्तरच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान अख्तरचे नाव समोर आले होते. या प्रकरणात तो फरार आरोपी आहे. आता त्याच्याच नावाने सैफला धमकी मिळाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

माझ्या काकांचा जळालेला चेहरा कधीच विसरणार नाही; पुतळे जाळणाऱ्यांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

धमकी नेमकी कोणी दिली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध मुंबई पोलिस घेत आहेत. धमकीचा स्रोत शोधण्यासह या प्रकरणाशी संबंधित इतर माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

follow us