मोठी बातमी! कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार, काँग्रेसच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

मोठी बातमी! कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार, काँग्रेसच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

 Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ तसंच पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठी बातमी समोर आली आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यातच आता कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. याबाबतची माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत? मोठी बातमी! अखेर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, भाजपाच्या प्रयत्नांना यश

कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. त्यानुसार किशोर जैन यांची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच, नाना पटोले हे मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत ते आमचे मित्र आहेत. मुंबईचा पदवीधर मतदार संघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकते आहे, ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. तसंच, नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे, असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही 180 ते 185 जागा जिंकू

लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मनाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं. 158 जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसाला असला तरी आम्हाला विधानसभा निवडणुकीत सावधगिरीने पावलं उचलावं लागतील. आमची अपेक्षा 180 जागांची आहे. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकारी येईल. आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

26 जूनला विधानपरिषदेसाठी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. तर, 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली.

कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरलाय

कोकण पदवीधर
निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध किशोर जैन (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध रमेश कीर (काँग्रेस) विरुद्ध संजय मोरे (शिवसेना) विरुद्ध अमित सरैय्या (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

मुंबई पदवीधर
किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध दिपक सावंत (शिवसेना)

मुंबई शिक्षक
शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर(शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (राष्ट्रवादी), सुभाष मोरे (शिक्षक भारती )

नाशिक शिक्षक
किशोर दराडे (शिवसेना)
महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस)
संदीप गुळवे (शिवसेना ठाकरे गट)
दिलीप पाटील (काँग्रेस)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube