संजय राऊत म्हणाले, वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय

संजय राऊत म्हणाले, वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय

मुंबई : वीर सावरकरांबाबतची (Veer Savarkar)आमची भूमिका आम्ही सातत्यानं स्पष्ट केली आहे. माझी याबद्दल राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi)अनेकदा चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ नेत्याशीही चर्चा होते. चार दिवसांपूर्वी जयराम रमेश (Jayram ramesh)यांच्याशीही या विषयावर बोललो आहोत. वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय असल्याचे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रात सावरकरांवर टीका करणे, त्यांना माफिवीर म्हणणं अशा प्रकारची टीका आम्ही खपवून घेणार नसल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले. आमच्या अनेक पिढ्या आम्ही लहानपणापासून सावरकरांकडून प्रेरणा घेऊन लढाईला उतरलो आहोत. मालेगावच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)ते स्पष्ट केले आहे. आज सामनातून सुद्धा आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं की, मी आज दिल्लीला जाणार आहे. या विषयावर राहुल गांधींना याविषयावर बोलणार आहे.

एका व्यक्तीच्या अहंकारामुळे मुंबईचा विकास अडीच वर्षे…

उद्धव ठाकरे मालेगावमध्ये बोललेलं ही मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला त्यावर राऊत म्हणाले की, काही पक्ष म्हणतात म्हणजे ते पक्ष आहेत का? पिसं गेलेले कावळे आहेत अशी टीका केली. त्यामुळे त्यांच्याकडे काय लक्ष देता. आमचा पक्ष काय आहे? हे तुम्ही मालेगावच्या सभेत पाहिला असेल. त्यामुळे आम्हाल पक्ष काय? मॅच फिक्सिंग वैगेरे काय ते सांगू नये. तुमचं जे महाराष्ट्रात मॅचफिक्सिंग सुरु आहे ते सुरु ठेवा असा टोला शिंदे गटाला यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे.

सुहास कांदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी त्यावर संजय राऊत म्हणाले की, कोण बोलतंय हे? ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटींचा भाव मिळाला आणि बिचारा शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय. मालेगावच्या सभेने भविष्यात जनता कोणाची नार्को टेस्ट करणार आहे? हे स्पष्ट झालेलं आहे.

खेडच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच मैदानावर सभा घेतली, त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावच्या सभेनंतर उत्तरसभा घेणार असल्याचे समजतेय असा प्रश्न केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, मुख्यंत्र्यांना काहीच काम नाही, मुख्यमंत्र्यांना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा दिशांना सभा घेण्याचा एक छंद जडला आहे. उत्तर सभा घेतील त्यानंतर मग एक दक्षिण सभा घेतील मग अग्नेय सभा घेतील. दुसरं काम काय आहे त्यांना असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार कसा जगतोय याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढताहेत हे जरा समजून घ्यावा असाही सल्ला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube