शिवीगाळ केली, दगड फेकले…; मध्यरात्री शिंदेंचे खास मंत्री शिरसाटांच्या घरासमोर तुफान राडा….

  • Written By: Published:
शिवीगाळ केली, दगड फेकले…; मध्यरात्री शिंदेंचे खास मंत्री शिरसाटांच्या घरासमोर तुफान राडा….

Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तरूणाने नेमका हल्ला का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा शिरसाट घरात उपस्थित होते का? त्याबद्दलही काही माहिती समजू शकलेली नाही.

सूरज चव्हाण… तात्काळ राजीनामा द्या, लातूर प्रकरणानंतर अजित पवारांच्या सूचना

मध्यरात्री नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ घुले असे शिरसाटांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास छ.संभाजीनगर येथील मंत्री शिरसाटांच्या बंगल्यासमोर घुले याने मद्यधूंद अवस्थेत जोरदार शिवीगाळ करत दगडफेक केली. घटनेवेळी घुले याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्यानंतरही त्याने शिवीगाळ करत बंगल्यावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. सध्या घुले याला ताब्यात घेण्यात आले असून, घरावर हल्ला केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravindra Chavan Exclusive : हिंदीसक्तीवरून भाजपची कोंडी ते फडणवीसांची स्पेशल स्क्रिप्ट

विविध मुद्द्यांमुळे शिरसाट चर्चेत 

संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर आरोप झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी विट्स हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिरसाटांवर झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांचा सहभाग होता. या हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये आहे, पण ते फक्त 67 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यानंतर शिरसाटांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केलं. मात्र, विरोधकांनी हा विषय चांगलाच लावून धरलाय. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर शिरसाट यांच्यावर आयकर खात्याची वक्रदृष्टी पडली आणि आयकर विभागानं शिरसाटांना नोटीस पाठवलीय.

नवरा बायकोच्या भांडणात त्रिशूल लागून चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला 

शिरसाट यांचा कथित व्हिडिओ व्हायरल..

त्यानंतर शिरसाट यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहेत. तसेच शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसते आहे. खासदार संजय राऊतांनीच हा व्हिडीओ समोर आणलाय. प्रसारमाध्यमांच्या हाती हा व्हिडिओ लागला असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली होती.

शेंद्रा जमीन प्रकरण

संजय शिरसाट यांनी नियम डावलून आणि पदाचा गैरवापर करून शेंद्रा एमआयडीसीमधील पाच एकर जमीन स्वस्तात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. ही जमीन त्यांच्या मुलगा सिद्धांत आणि इतर कुटुंबीयांच्या नावावर नोंदवण्यात आली. या जागेवर 105 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा प्रकल्प उभा राहणार होता. पण शिरसाटांनीमंत्रिपदाचा गैरवापर करून या जागेवरील आरक्षण उठवले. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC)ने लिलाव न करता ही जमीन दिल्याचं सांगितलं जातं.

Ravindra Chavan Exclusive : बडगुजरांनंतर आता दाऊदला भाजपात रेडकार्पेट? चव्हाणांनी सांगितला पक्षप्रवेशाचा फॉर्मुला…

सिद्धांत शिरसाटांवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वीच एका विवाहित महिलेने सिद्धांत शिरसाट यांच्यावर शारीरीक छळाचा आरोप केला होता. तसेच मारहाण आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचाही आरोप केला होता. महिलेनं 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शिरसाटांच्या घरावर तरूणाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांचा आणि या हल्लाचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, हल्ल्याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube