School Uniform : ‘एक राज्य, एक गणवेश’चा अट्टाहास का?; दीपक केसरकरांनी सांगितलं खरं कारण

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 05 24 At 5.54.12 PM

जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्या अनुषंगाने राज्यसरकार कामाला लागले आहे. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शालेय गणवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले कुणालाही गणवेश विकत घ्यावा लागणार नाही. सर्व शाळांना एकच गणवेश असावा अशी शासनाची भूमिका आहे. परंतु काही समित्यांनी गणवेश घेतल्याने यंदा सर्वांना सारखे गणवेश असू शकत नाहीत असे मंत्रीदीपक केसरकर यांनी सांगितले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढच्यावर्षी पासून सर्व शाळांना स्काऊट आणि गाईड हे अनिवार्य असेल त्यामुळे सर्व शाळांचा गणवेश देखील त्याला पूरक असा एकच असणार आहे. असे यावेळी मंत्री केसरकरांनी सांगितले. हा गणवेश शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत दिला जाईल. या गणवेशाची सरासरी किंमत ही 800 असणार आहे. असे कॉलेजयामध्ये NSS आणि NCC असते तसेच आता शाळांमध्ये देखील स्काऊट आणि गाईड हे अनिवार्य असणार आहे.

अनिल देशमुखांना सगळंच माहित होतं; ‘त्या’ गौप्यस्फोटावर राऊतही बोलले

आता काही शाळांनी जे गणवेश अगोदरच घेतली असतील तर ते गणवेश देखील मान्य असतील त्यांना देखील नवीन स्काऊट आणि गाईड चा गणवेश दिला जाईल परंतु त्या शाळांना नवीन गणवेश तीन दिवस वापरणे अनिवार्य असेल असे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

पुढच्या वर्षीपासून सर्व शाळांना आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट असा गणवेश असेल तसेच त्या सोबत पांढऱ्या रंगाचे बूट असतील हा सर्व गणवेश शासनाकडून विध्यार्थ्यांना मोफत दिला जाणार आहे.

Tags

follow us