अहिल्यानगरमध्ये सर्व दूर अतिवृष्टी; शालेय व्यवस्थापन समित्यांना शाळा बंद करण्याचा अधिकार

Heavy rain in Ahilyanagar मध्ये अतिवृष्टीने नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टीचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना देण्यात आला आहे.

Letsupp (27)

Schools Management committee right to close schools due to Heavy rain in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी 13 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे. यामध्ये काही ठिकाणी संततधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर  स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे.

UPI Payment : आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

‘त्या’ अपहरणाच्या प्रकरणात पूजा खेडकरच्या वडिलांचा सहभाग? पोलीस पोहोचताच काय घडलं..

या पार्श्वभूमीवर 15 व 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथापि या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका; नेपाळमध्ये आंदोलनाचे दुष्परिणाम

दरम्यान पाथर्डी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीपात्रातून ओढ्यातून मोठ्या प्रमाणावरती पाणी हे रस्त्यावरून पुलावरून वाहत आहे.तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,कृपया आपण सुरक्षित ठिकाणी थांबावे कोणीही कामाशिवाय घराबाहेर जाऊ नये.तसेच नदीपात्राशेजारी राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी प्रथम कृपया घरातील व्यक्तींना बाहेर पाठवू नये तसेच ज्या पुलावरून पाणी जात आहे.त्या ठिकाणावरून प्रवास करू नये.असं आवाहन प्रांताधिकारी पाथर्डी चे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी नागरिकांना केले आहे. तसेच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून तसेच कोणीही कुठेही नागरिक अडकलेले असतील तर त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असं आव्हान देखील मते यांनी केले आहे.

 

follow us