प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हंगामी भाडेवाढ रद्द; दिवाळीच्या तोंडावर महामंडळाचा ‘मास्टर स्ट्रोक’ निर्णय

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हंगामी भाडेवाढ रद्द; दिवाळीच्या तोंडावर महामंडळाचा ‘मास्टर स्ट्रोक’ निर्णय

ST Bus : एसटी महामंडळाने (ST Bus) ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा दिलायं. यंदाच्या वर्षी हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलायं. यासंदर्भातील परिपत्रक महामंडळाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सध्या सुरु असलेल्या तिकीटीच्या दरानूसारच प्रवास करता येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरु आहे. उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळपासूनच मॅरेथॉन बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यात येत असून त्यापैकीच एक म्हणजे एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द करण्यात आलीयं.

दरम्यान, मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून हा निर्णय लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube