चंद्रकांत पाटलांचं 1 वर्ष अन् मुख्यमंत्र्यांची 24 तारीख, सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल; पवारांचा आरोप
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील म्हणजे भाजप आणि मुख्यंमंत्री शिंदेंची भूमिका ही मराठा तरूणांची दिशाभूल करणारी असल्याची टीका केली. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
महाविकास आघाडीत येण्याचा आंबेडकरांचा मार्ग मोकळा! शरद पवारांनी दिला ग्रीन सिग्नल
मराठा आरक्षणावर बोलताना पवार म्हणाले की, आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्येच मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत या सर्व घटकांना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी काही मदतीची गरज आहे. ती करायची असेल तर त्यांना आरक्षण द्यावे लागेल. अशी भूमिका घेतली असल्याचं सांगितलं.
‘आमदार अन् प्रकल्प पळवून स्वत:चाच विकास’, भाजपच्या विकासावर सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका
त्यासाठी गेले काही वर्षांपासून महाराष्ट्रात मागणी देखील होत आहे. आरक्षण देण्याचा आग्रह देखील धरला जात आहे. यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. ती मागणी पूर्ण करा. मात्र मराठा समाज मागणी पूर्ण करताना ओबीसी समाजातील घटकांच्या हक्काला धक्का लागता कामा नये. कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देऊ नये अशीच भूमिका राष्ट्रवादीने सातत्याने घेतली आहे.
LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?
पण सध्या असलेल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा आश्वासन दिले. मी जरांगेंची भेट घेतली होती. तेव्हा ती मला म्हटले होते. सरकारशी बोलणं चालू आहे आणि त्यानंतर लगेचच सरकारने त्यांच्या काही मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्याचे ही समोर आलं. जरांगे यांना सग्या-सोयऱ्यांसह सर्वांना आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र आता सरकार वेगळी भूमिका घेत आहे. तरुणांना आपली फसवणूक झाली असल्याची भावना आहे.
तसेच येता आठ दिवसांमध्ये सरकार काही निर्णय घेणार असल्याचे समजते मात्र या दरम्यान चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की, मराठा समाजाला आरक्षणासाठी कमीत कमी एक वर्ष तरी वाट बघायला हवी. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 24 तारखेच्या आत आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याचा अर्थ सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा आश्वासन दिले होते. पण नऊ वर्ष होऊन देखील त्याची पूर्तता झालेली नाही. अशी टीका शरद पवारांनी केली.