Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा अन् पवार गटात नाराजी; खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sharad Pawar

Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र ठेवण्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे डिलिमिटेशनवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु असल्याने पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज असल्याची माहिती आता समोर येत आहे. तर दुसरीकडे पक्षातील काही आमदार आणि खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर चर्चा देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशनला पाठिंबा दिला तर पक्षातील काही आमदार आणि एक खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत जाण्याचा विचार करु शकतात असं देखील आता सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाला महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देऊ. शरद पवारांना राज्यसभेवर महाविकास आघाडीने (MVA) निवडून आणलं आहे.

अनेकांचा विरोध होता हे सुप्रिया सुळेंना माहिती आहे आणि तुम्ही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

क्राइस्टचर्चमध्ये भारतीय संघ अडचणीत; केएल राहुलसह सहा फलंदाज बाद-

follow us