शरद पवारांची पार्थ-जय पवारांसोबत बैठक; महत्वाची पदं आणि विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?

अजित पवार यांच्याकडे असलेल्या महत्वाच्या संस्थात्मक पदांचीही पवार कुटुंबात वाटणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (365)

Sharad Pawar’s meeting with Partha-Jay Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारल्यानंतर आता अजित पवार यांच्याकडे असलेल्या महत्वाच्या संस्थात्मक पदांचीही पवार कुटुंबात वाटणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अजित पवार हे अनेक सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि साखर कारखान्यांवर अध्यक्ष किंवा संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर ही पदे रिक्त झाली असून, ती पदे पवार कुटुंबातील सदस्यांकडे सोपवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पार्थ पवार, जय पवार तसेच विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार हे अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या विविध संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती केली जाणार, हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्टिट्यूटचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे संचालक तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशा अनेक महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. या सर्व पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील काही अत्यंत महत्वाची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे नेमकी कोणती पदे दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री… शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील यांची आणखी एक स्वतंत्र बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत कोणते निर्णय होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या बैठकीचा मुख्य विषय हा दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण असल्याची माहिती समोर येत आहे.

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

दरम्यान, पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील प्रवेशाबाबतही राजकीय चर्चांना वेग आला आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेची दोन वर्षांची मुदत शिल्लक असून, त्यांची टर्म 4 जुलै 2028 रोजी संपणार आहे. मात्र ही उर्वरित मुदत स्वीकारण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण कालावधीसाठी राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

लवकरच राज्यसभेची एक जागा रिक्त होणार असून, त्या जागेसाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचेही समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

follow us