शीतल तेजवानीचा नवा कारनामा समोर.. बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूरलाही पाठवली होती नोटीस…

Sheetal Tejwani : मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीबद्दल रोजच नव-नवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या

  • Written By: Published:
Sheetal Tejwani

Sheetal Tejwani : मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीबद्दल रोजच नव-नवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तेजवानीकडून मिळणाऱ्या माहितीमुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. चौकशीदरम्यान शीतल तेजवानी आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील वाद उघडकीस आला आहे.

तेजवानीने रणबीर कपूरविरुद्ध (Ranbir Kapoor) तब्बल 50 लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद पुण्यातील ट्रॅम्प टॉवरमधील एका भाडेकराराशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. तेजवानीचा (Sheetal Tejwani) आरोप आहे की रणबीर कपूरने संबंधित फ्लॅटच्या करारातील निकषांचे पालन केले नाही. विशेषतः ‘लॉक-इन’ कालावधी पूर्ण न केल्यामुळे आर्थिक तोटा झाला, असल्याचा दावा तिने न्यायालयात केला आहे. हा दिवाणी दावा सध्या न्यायालयात प्रलंबित असून, यावर पुढील सुनावणी 5 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

दरम्यान, मुंढवा जमीन घोटाळ्यात अमेडिया कंपनीतील 1 टक्के भागभांडवल असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या नोटिशीनंतर ते आज चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या गुन्ह्यात शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप असून तपास वेगाने चालू आहे. अधिकारी रवींद्र तारू यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

2026 मध्ये 24 सार्वजनिक सुट्ट्या, महाराष्ट्र सरकारकडून यादी जाहीर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून रोजच याप्रकरणी नवनवे आरोप केले जात आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीभोवती फास आवळला जाणार का ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावध राहा, पुढील 48 तास पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ 13 जिल्ह्यांत थंडीची लाट; अलर्ट जारी

follow us