स्व. अजित पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या संगमनेर शहर प्रमुखाची हकालपट्टी
Dinesh Fatangare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक करत
Dinesh Fatangare On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक करत आहे. सर्व राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. तर दुसरीकडे संगमनेरात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर (Sangamner) पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर फटांगरे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे, मात्र यापूर्वी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून शिवसेना (शिंदे गट) उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिनेश फटांगरे (Dinesh Fatangare) यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना दिनेश फटांगरे यांनी सोशल मीडियावर स्व. अजित पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट करत गरळ ओकली. त्यामुळे सर्वांचाच संतापाचा बांध फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय कार्यकर्ते, युवक संघटना यांनी दिनेश फटांगरे यांचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले मात्र तो मिळून आला नाही.
तसेच फटांगरे याच्या विरुद्ध उत्तर नगर महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली राऊत यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे, मनीष माळवे, किरण घोटेकर, वैशाली राऊत, संध्या खरे, सरला भूजबळ, भाऊ म्हस्के, रईस पठाण, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, सुभाष राहणे, हर्षल राहणे, अमजद शेख, किरण पाटणकर, सुभाष दिघे, विजय पांढरे, दिनेश डफेदार, गजानन भोसले, प्रसाद गोरे, बाबू आवारी, अभिषेक तांबे, प्रतीक गाडेकर, शुभम डांगे, अक्षय भालेराव, अक्षय आव्हाड, सचिन पवार, तुषार वाळे, दिपक रणशेवरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले स्व. अजित पवारांचे स्टेटस्
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार हे मनमिळावू व शिस्तबद्ध असे नेते होते. राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते दिवस रात्र झटत होते. अनेकांना ते भेटले देखील नाही परंतु त्यांच्या बद्दल सर्वांनाच आपुलकी होती. आज ते आपल्यात नाही, परंतु अनेकांनी त्यांच्या श्रद्धांजली स्टेटस् ठेवले असून असा नेता पुन्हा होणे नाही अशी हाक अनेकांनी दिली आहे. यातूनच समजते की स्व. अजित पवार हे जनमानसातील नेते होते.
विमान आता लँडिंग होणार आहे तुम्ही आलात का?; शेवटचा फोन आणि अंगरक्षकाच्या डोळ्यासमोरच कोसळले विमान
