… म्हणून रोहित पवारांकडून Advance मध्ये सुनेत्राकाकींना शुभेच्छा; सोशल मीडियावर ट्विट व्हायरल

… म्हणून रोहित पवारांकडून Advance मध्ये सुनेत्राकाकींना शुभेच्छा; सोशल मीडियावर ट्विट व्हायरल

Rohit Pawar On Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत (Rajya Sabha) आपले 3 सदस्य असतील अशी मोठी घोषणा केली होती मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर कोणाला संधी मिळणार याबाबात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे प्रफुल पटेल (Praful Patel) यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली असून या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha Election 2024) होत आहे आणि या निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज (13 जून) दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

अजित पवार गटातून यावेळी राज्यसभेवर मंत्री छगन भुजबळ, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, बाबा सिद्दिकी तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांपैकी (Sunetra Pawar) एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी करत आहे. यामुळे अजित पवार यावेळी कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे आता या प्रकरणात कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील एक ट्विट करत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना अडव्हान्समध्ये शुभेच्छा देत येणाऱ्या काळात अजित पवार गटात फूट पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या रोहित पवारांचा ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय… म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!!! असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यामुळे आता अजित पवार यावेळी राज्यसभेवर कोणाची निवड करणार हे उद्या स्पष्ट होणार आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

थोडं थांबा, चार सहा महिन्यांत सरकार बदलाचंय आहे’, शरद पवारांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube