थोडं थांबा, चार सहा महिन्यांत सरकार बदलाचंय आहे’, शरद पवारांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग

थोडं थांबा, चार सहा महिन्यांत सरकार बदलाचंय आहे’, शरद पवारांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दमदार कामगिरी करत 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवत अनेकांना धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) रणशिंग फुकले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इंदापूर (Indapur) तालुक्यात होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना जरा थोडे थांबा… पुढच्या चार सहा महिन्यांत मला राज्यातील सरकार बदलायचे आहे, असे वक्तव्य केले आहे.

आज शरद पवार इंदापूर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत लवकरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.

यावेळी शरद पवार म्हणाले, जेव्हा माझ्या हातात देशाचे कृषिमंत्रीपद होते तेव्हा मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि शेतमालाचे भाव वाढवून दिले होते. सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी करायचा असतो मात्र आताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही मला तुमच्या पाण्याचा आणि दूध दरवाढीचा प्रश्न समजतोय. जरा थोडे थांबा पुढच्या चार सहा महिन्यात मला राज्यातील सरकार बदलायचे आहे. असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शंभर टक्के दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान मिळालेच पाहिजे. दुधाचा धंदा आजच्या घडीला संसार चालवायला हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. या संबंधीचा प्रश्न सरकारला सांगून बघू जर सरकारने ऐकले नाहीतर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असं देखील शरद पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांवर विश्वास मात्र त्यांचे ओएसडी…’ मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

जेव्हा माझ्याकडे देशाच्या शेतीचे खाते होते तेव्हा मी देशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली होती आणि शेतमालाचे भाव वाढवून दिले, दुधाला दरवाढ दिली होती मात्र आताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी घटकाविषयी आत्मियता नाही असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज