नात्याला काळीमा फासणारी घटना, मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला संपवलं

स्थानिकांनी या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच घटनास्थळी धाव घेतली.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 22T224832.018

छत्रपती संभाजीनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. (Sambhajinagar)  मुलानेच आपल्या बापाचा जीव घेतला आहे. प्रेताला दुर्गंधी आल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. या घटनेने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरलं आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण या गावात खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे लेकानेच बापाचा खून केला आहे. बापाल मारून या आरोपीने प्रेत तब्बल दहा दिवस घरातच त्यांना ठेवलं. कल्याण बापूराव काळे (वय ६०) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. तर रामेश्वर कल्याण काळे असं आरोपी मुलाचं नाव आहे.

पुणे ते शिरूर अन् अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

आरोपी रामेश्वार काळे याने दहा दिवसांपूर्वी आपल्याच वडिलाचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर त्याने लगेचच आपल्या वडिलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. मृतदेह घराबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणे अवघड असल्याचे समजताच त्याने घरात मोठा खड्डा केला. त्याने मृतदेह घरातच पुरून टाकला. त्यानंतर तब्बल दहा दिवस तो निवांत राहिला. परंतु, घरातून दुर्गंधी येत असल्याने घटनेला वाचा फुटली.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपीच्या घरावजळ मोठा फौजफाटा घेऊन गेले होते. आरोपी मुलगा रामेश्वर काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी रामेश्वर याने बापाचा खून का केला? याचा पोलीस आता तपास करत आहेत. परंतु, या घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

follow us