विरोधकांवर टीका करण्याऐवजी मोदींनी देशात काय केलं? शरद पवार परभणीत कडाडले
Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. (Mahavikas Aghadi) ते परभणीत आयोजीत सभेत बोलत होते.
असे लोकं आम्ही कधी पाहिले नव्हते
पंजाबचे शेतकरी आपल्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनाला बसले होते. तसंच, आजही काही आंदोलन करत आहेत. दिल्लीत ऊन खूप असंत, थंडी खूप असते आणि पाऊसही मोठा असतो. अशा वातावरणात शेतकरी सुमारे एक ते दीड वर्ष आंदोलन करत होता. मात्र, मोदी सरकारने यांच्याकडे डुंकुनही पाहिलं नाही असा आरोप शरद पवारांनी यावेळी मोदींवर केला. तसंच, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या. असं सरकार आणि सरकारमधील लोकं आम्ही कधी पाहिले नव्हते अशी खंतही पवारांनी यावेळी व्यक्त केली.
विरोधकांना जेलमध्ये टाकलं
विरोधकांवर टीका केली की त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, त्यांना तुरुंगात टाकणार असं सध्या या देशात सुरू आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सुरेन यांना जेलमध्ये टाकलं आहे असा दाखलाही पवारांनी दिला. त्यामुळे असं सरकार आपल्याला सत्तेतून बाजूला करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी इंडिया आघाडीच्या उमेवारांना विजयी करावं असा आवाहनही पवारांनी यावेळी केलं.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात
विरोधकांवर टीका करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर देशासाठी काय केल हे सांगावं असा थेट प्रश्नच शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. मोदी कायम नेहरूंवर टीका करतात, ते कधी राहुल गांधींवर टीका करता, बऱ्याचदा माझ्यावरही टीका करतात. मात्र, काय काम केली आणि काय करणार यावर चकार शब्दही बोलत नाहीत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. तसंच, मला वाटत मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून भाजपचे पंतप्रधान आहेत अशी बोचरी टीकाही पवारांनी यावेळी मोदींवर केली.