Video : मला राज्यपाल करणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे; भुजबळांची रोखठोक भूमिका
Chhagan Bhujbal in Youth Parliament : मसत्ता जी आहे कधी येईल कधी जाईल सांगता येत नाही. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. अनेकांना किती आणि कोण मुख्यमंत्री झालेत हे सांगता येणार नाही. (Bhujbal) सत्तेत असावच असं नाही. सत्तेत नसूनही अनेकजण चर्चेत असतात. त्यांच्या कामामुळे त्याचा उपयोग ते समाजासाठी करत असतात. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण त्या प्रमाणे मी वागत आलोय अशा शब्दांत आपल्या भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. ते पुण्यात आयोजीत आठव्या युवा संसदेमध्ये बोलत होते.
अजितदादांनी डावललं, फडणवीस-शाहंनी गोंजारलं; भुजबळांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ आलाय?
बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आज ही माझ्यात आहे. बाळासाहेब यांच्यासोबत काही मतभेद झाले हे खरे आहे असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर शरद पवार साहेंबानी नोकरीत, शिक्षणात आरक्षण दिलं याची आठवणही भुजबळ यांनी यावेळी सांगितली. राजकारणात कधी कधी मागं जाव लागत असं म्हणत त्यांनी स्वत:च्या सध्याच्या परिस्थितीवरही अप्रत्यक्ष भाष्य केलं. दरम्यान, तुम्हाला राज्यपाल करण्याचा प्रस्ताव आहे असा विषय निघाला तेव्हा मला राज्यपाल करणं म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे अशा ठोस शब्दांत भुजबळ यांनी तोफ टाकली.