सोशल मीडिया कमेंट्समध्ये शिवीगाळ करताय… सावधान! राज्यसरकार नवा कायदा आणण्यासाठी सकारात्मक

law for abusive language in social media comments नवा कायदा तयार करण्याचा विचार आम्ही करतोय असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी कदम यांनी दिला आहे.

New Law For Abusive Language In Social Media Comments

state government is favorably inclined towards introducing new law for abusive language in social media comments : आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तिय संस्थांमध्ये हितसंबंध संरक्षणाचं विधेयक चर्चेला आलं. त्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी भाषणं केली. या कायद्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना संरक्षण मिळेल. तसेच ठेवीदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून त्यांची डिजीटल संसाधनांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल. त्यामुळे डिजीटल फसवणूकीला आळा घालण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं पाऊल वाटत आहे.

Pune Rain : मुंबईनंतर पुण्यात भररस्त्यात कोसळलं झाड; थोडक्यात बचावली तरुणी

याच दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सायबर सुरक्षेवरून सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडीयावरील अश्लील, अश्लाष्य आणि शिवीगाळ करणाऱ्या कमेंट्सवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यात कठोर शिक्षा होणारा कोणताही कायदा नाही. तसा कायदा असावा यासाठी जयंत पाटील यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विनंती केली आहे. तसेच म्हणाले सायबर क्राईमचा जो बॉस आहे. त्याला सांगा तो अयशस्वी आहेस.

WhatsApp Username रिझर्व्ह करताय तर थांबा…; केंद्र सरकार चौकशीच्या तयारीत

यावर उत्तर देताना योगेश कदम म्हणाले की, हे खरं आहे की, कमेंट्सवर जर आपण नजर फिरवली तर काही काही अत्यंत वाईट भाषेमध्ये असतात. शिवागाळ केली जाते. त्यावर कोणताही सेन्सॉरच नाही. कंपनीकडे तक्रार केली तर ते अकाऊंट डिलिट करतात. पण त्यावर ठोस असं नियंत्रण नाही. त्यामुळे याबाबतीत नवा कायदा तयार करण्याचा विचार आम्ही करतोय असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी कदम यांनी दिला आहे.

 

follow us