राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार
State level hockey tournament inaugurated by MLA Ashutosh Kale : गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच हॉकी,फुटबॉल, जिमनॅस्टीक, मल्लखांब अशा अनेक खेळाच्या उत्तम प्रशिक्षणातून गौतम पब्लिक स्कूलच्या (Gautam Public School) विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून दाखवत राज्य स्तरावर गौतम पब्लिक स्कूलच्या नावाचा दबदबा तयार केला आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, सर्व क्रीडा प्रकारासाठी उपलब्ध असलेली विस्तीर्ण मैदाने आणि अनुकूल परिस्थितीमुळे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांचे यशस्वीपणे केले जाणारे आयोजन गौतम परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. या राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार होत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे(Ashutosh Kale) यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे (Hockey Tournament) उद्घाटन संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवार (दि.06) रोजी मशाल प्रज्वलित करून तसेच विशेष तयार करण्यात आलेली हॉकी स्टिक विविध रंगी फुग्यांच्या सहाय्यानेआकाशात सोडून मोठ्या दिमाखात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांनी गौतम पब्लिक स्कूलची स्थापना केली.
…या जन्मात तरी भाजपला ‘ते’ शक्य नाही, ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंचा थेट वार
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच संगीत,कला आणि क्रीडा क्षेत्रावरही विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूलने नेहमीच क्रीडा क्षेत्रावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. खेळामुळे शिस्त, संघर्षशक्ती आणि संघभावना जोपासली जाते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही पुढे येणे, ही काळाची गरज आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू घडावेत यासाठी गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सिलेक्शन कमिटीकडून स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून महाराष्ट्राच्या शालेय हॉकी संघासाठी अंतिम संघ जाहीर केला जाणार असून हा संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रमाणेच संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकरावजी काळे व आमदार आशुतोष काळे यांना शिक्षणाबरोबरच खेळाविषयी विशेष प्रेम आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन असेल त्यासाठी आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांचे विशेष सहकार्य मिळत असल्यामुळे सर्वच स्पर्धा यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकतर विरोधी पक्षनेतेपद द्या; नाहीतर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा; उद्धव ठाकरे यांची कायदेशीर मागणी
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खूरंगे, निवड समिती सदस्य उदय पवार, उमेश बडवे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, तालुका क्रीडा अधिकारी सागर कारंडे, तालुका क्रीडा अधिकारी वैशाली सुळ, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोडावळे, माजी क्रीडा अधिकारी महेश कुटाळे, विजयराव जाधव, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यांच्यासह संघव्यवस्थापक,पंच, खेळाडू आणि परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर व अमरावती अशा आठ विभागातील मुला-मुलींचे एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व डॉन बॉस्को स्कूल (मुंबई विभाग) यांच्या मध्ये खेळला गेला. सदर सामना गौतम पब्लिक स्कूल संघाने 3-0 असा जिंकला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाने नाशिक विभागाचा पराभव केला. उद्याnस्पर्धेचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व डी. सी. नरके विद्यालय, कुडीत्रे (कोल्हापूर विभाग) यांच्या दरम्यान होणार आहे. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि सिलेक्शन ट्रायलसाठी उपस्थित शंभरहून अधिक खेळाडूंच्या निवास व्यवस्थेपासून ते भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले आहे.
