कोल्हे अन् थोपटेंच्या कारखान्यांना मदतीच्या यादीतून वगळले, सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर खैरात…

कोल्हे अन् थोपटेंच्या कारखान्यांना मदतीच्या यादीतून वगळले, सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर खैरात…

Sugar Factory: केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणाऱ्या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यात आले. यात भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) आणि अहमदनगरमधील विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या कारखान्यांना मार्जिन मनी लोन (Margin Money Loans) देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, लोकसभेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर थोटे आणि कोल्हेंच्या कारखान्यांना वगळण्यात आले.

काही झालं तरी हजर राहणार नाही, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगेंची भूमिका… 

कागदोपत्री त्रुटी काढून कारखान्याचे प्रस्ताव रद्द…
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्याचे थकहमी अर्थात मार्जिन लोनचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीने राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे म्हणजे, एनसीडीसीकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र , यातील संग्राम थोपटे यांचा राजगड साखर कारखाना आणि विवेक कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढून कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे.

मॉर्निंग वॉकमधून थेट शाळेकडे वळाली अनिल कपूरची पावलं; बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा 

संग्राम थोपटे यांनी बारामती लोकसभेमध्ये अजित पवार यांना शब्द देऊन सुद्धा अपेक्षित मदत न केल्यामुळे त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयाचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव रद्द केल्याची माहिती आहे. तर कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा 125 कोटी रुपयांचा मार्जिन लोन थक हमी प्रस्ताव रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे कुटुंबाचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. विवेक कोल्हे यांची माजी खासदार सुजय विखे यांना निवडणुकीत मदत झाली नाही. याचबरोबर विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघमधून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी पक्षाच्या विरोधात घेतलेल्या धोरणामुळे त्यांचा सुद्धा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला आहे.

…तरीही कारखान्यांना मदत नाहीच
राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांना मदत दिली जाते, पण, विरोधी पक्षाल्या नेत्यांच्या कारखान्यांना मदत दिली जात नाही, असा सहकारी क्षेत्रातून तक्रारीचा सूर आहे. याच मुद्द्यावरती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व कारखान्यांना मदत देण्याची विनंती केल्याची माहिती आहे. मात्र, तरीही थोपटे आणि कोल्हेंचे सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube