शंकरराव गडाखांच्या पक्षांतराच्या गाडीला सुजय विखेंकडून ब्रेक…कुणासाठी जागाच नाही
Sujay Vikhe On Shankarrao Gadakh : 'संगमनेरची गाडी रुळावर आणली, आता मी नेवाशाचा 'व्हीजीटिंग डाॅक्टर' आहे. नेवाशाची गाडी देखील
Sujay Vikhe On Shankarrao Gadakh : ‘संगमनेरची गाडी रुळावर आणली, आता मी नेवाशाचा ‘व्हीजीटिंग डाॅक्टर’ आहे. नेवाशाची गाडी देखील रुळावर आणणार आहे, आणि आपण ते करू शकतो,’ असे म्हणतच माजी खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री राहिलेल्या शंकरराव गडाख यांच्यावर निशाणा साधला. प्रस्थापित गडाखांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले व नेवासामध्ये विखेंच्या मदतीने शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे आमदार झाले.
लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखे (Sujay Vikhe) हे जास्त सक्रिय झाले असून एक एक मतदार संघावर बारकाईने लक्ष ते देत आहे. तर दुसरीकडे माजीमंत्री राहिलेले गडाख हे एकीकडे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा असताना विखे यांनी नेवाश्यात येऊन एक महत्वाचे विधान केले अन राजकीय चर्चाना उधाण आले. आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही, असा टोला विखे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे नाव न घेता लगावला.
सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
नेवासा मध्ये नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहात असून या ठिकाणी सुजय विखे यांनी एक प्रचार रॅली काढली. यावेळी गडाखांच्या बालेकिल्ल्यात जात विखेंनी एक महत्वाचे राजकीय भाष्य केले. नेवासा इथं अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावर एका दिवसात तोडगा निघेल, असे नाही. मात्र नेवाशात जिल्ह्याला राजकीय क्षमता देण्याची ताकद आहे. नेवाशाची विकासाची जबाबदारी आमची आहे. तालुक्यात कुणी म्हणतंय आम्ही इकडे जाणार, तिकडे जाणार, मात्र आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही, असा शाब्दिक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव न घेता लगावला.
आमच्याकडे स्वतःची गाडी आहे…, गडाखांचे विखेंना प्रत्युत्तर
2019 मध्ये शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणुक लढवत ती जिंकली व त्यानंतर ते मंत्री देखील झाले. मात्र 2024 च्या निवडणुकीमध्ये लंघे यांच्याकडून गडाख यांचा पराभव झाला. राज्यात आघाडीला मोठा फटका बसला त्यानंतर अनेकांनी सत्ताधारी पक्षाकडे वाटचाल केली. गडाख देखील पक्षांतर करणार अशा चर्चा मतदार संघात रंगल्या होत्या. यातच भरात भर म्हणजे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये गडाख यांनी मशाल खाली ठेवत क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर आपले उमेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊसाला पहिली उचल प्र.मे..टन 3 हजार रुपये देणार; आ. काळेंची ग्वाही
यामुळे गडाखांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले. मात्र नेवासा इथं महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या सुजय विखे यांनी गडाखांच्या गाडीला शाब्दिक ब्रेक लावला. यामुळे येणाऱ्या काळात गडाख काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
