राष्ट्रवादीचं विलिनीकरण करू पण… प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंचे सूर बदलले

अजित पवारांच्या 1999 पासूनच्या 22 जुलैच्या वाढदिवसाला मी नाही असं कधी झालं नाही.

News Photo   2026 03 31T215751.653

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातील (NCP) माहिती होतं, माझा त्याला विरोध नव्हता. विलिनीकरण करु पण वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही. मी कराडला म्हटलं कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण, आम्ही भाजपसोबत एनडीएसोबत आहोत. विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं पण दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसताना विलिनीकरण खूप फरक आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केलं आहे.

अजित पवारांच्या 1999 पासूनच्या 22 जुलैच्या वाढदिवसाला मी नाही असं कधी झालं नाही. आता यावेळी मात्र मनाला वेदना होतील. 2026 ला 22 जुलैला वेदना होतील, दादांना जाऊन शुभेच्छा द्यायला ते नाहीत, हे कमालीचं दु:खद आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. अजितदादांच्या निधनानंतर स्वत:च्या मनाला सावरणं हे आव्हान होतं. अजितदादांनी जो विचार दिला तो अढळ निश्चयानं पुढं चालू ठेवणं हे आव्हान आहे. पक्षासाठी दादांच्या नंतर काय असा प्रश्न आहे. दादा गेले हे आयुष्यभर विसरता येत नाही, पण गेले ते सत्य आहे, वास्तव आहे. त्या ठिकाणी उत्तराधिकारी आलाच.

अजितदादांच्या विमान अपघाताची विधिमंडळात चर्चा करा; रोहित पवार आक्रमक थेट पत्रच दिले

जबाबदारीचं भान ठेवत मला आणि सहकाऱ्यांना वाटलं की सुनेत्रा वहिनी याच अजितदादांच्या उत्तराधिकारी असतील. अजितदादांना सुनेत्रावहिनींनी दीर्घकाळ साथ दिली आहे, ती आम्ही लक्षात घेतली आणि वहिनींसोबत चर्चा केली. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं, शपथविधीची प्रक्रिया पूर्ण करणं मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता घेणं हे करणं गरजेचं होतं. हे मी एकट्यानं केलं असं नाही, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आम्ही सर्वांनी केलं.

दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोस्ट मॉर्टम करुन आणलं पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झालं. पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलीनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं, आणखी एक सो कॉल्ड व्हिडिओ, दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे असं तो झालं. सलग दोन दिवस त्या मुलाखती सुरु राहिल्या.

मी त्या वेळी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता. ज्या पद्धतीनं ते सुरु झालं त्याचा अर्थ राजकीय अर्थ लक्षात आला की काही तरी घडतंय. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर विलिनीकरण नंतर होईल. विलिनीकरणाचा टोटल सिनॅरिओ बदलतो. आता माझा काही त्याला विरोध होता असा भाग नाही. मला त्या गोष्टीची माहिती होती, असं सुनील तटकरे म्हणाले.

follow us