Video : अजितदादांच्या पक्षाची अपरिमित हानी होणार; भोवतालचे कोंडाळे योग्य सल्ला देत नाही; धसांची भविष्यवाणी

Santosh Deshmukh Murder Case : भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांनी यावेळी थेट थनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Murder) राजीनाम्याचा अजित पवार यांनी चेंडू धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकला आहे. धनंजय मुंडेंनी त्याचा अर्थ समजून घेऊन राजीनामा दिला पाहिजे असंही धस म्हणाले आहेत.
100 टक्के मास्टरमाइंड
मी पहिल्या दिवसापासूनच या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचे सांगत आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले ही सगळे प्यादे आहेत, वापरून घेणारा तर वाल्मीक कराड आहे. वाल्मीक कराड हा 100 टक्के मास्टरमाइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. पोलिसांनी देखील आता वाल्मीक कराडचा सहभागावरती मोहोर लावली आहे. तिन्ही गुन्हे वाल्मी कराडवर लावले गेले आहेत. कलम 34 नुसार हे गुन्हे लावले गेले असल्याने वाल्मीक कराड हाच याचा मास्टरमाईंड असल्याचे सिद्ध झाल्याचंही ते म्हणाले.
फक्त शाई लावून जायचं
त्यांनी सांगितले की, निवडणुकीत देखील लोकांनी परळीत येऊन फक्त शाई लावून जायचं, मतदान यांनीच करायचं आजपर्यंत हेच घडले. या जगात फक्त पैसा सर्वश्रेष्ठ आहे हे वाल्मिक कराडने मानलं. भारत देशातील जेवढ्या अमानुष घटना झाल्या त्या सर्व घटना मागे सारेल, अशी घटना संतोष देशमुख यांच्याबद्दल झाली आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली. कृष्णा आंधळे कदाचित राज्याबाहेर गेला असावा असंही ते म्हणाले.
खंडणी ॲट्रॉसिटी सर्व एक आहे, यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही, आका आत गेले आहेत. पुरवणी आरोपपत्रात अजून अनेक लोकांची नावे येतील, देशमुख कुटुंबीयांची ही मागणी आहे. ज्यांची नावे येथील त्यांना वेगळा मोका लागला पाहिजे, वेगळा मोका लागून हे आत गेले पाहिजेत. भविष्यात कोणीही चुकीच्या लोकांना मदत करता कामा नये. अशांसाठी स्वतंत्र मोका लावावा ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.