पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने दोन गट आमनेसामने; भारताच्या विजयानंतर मिरजेत तणाव

Tension in Miraj after India-NZ Match : भारताचा दणदणीत विजय झाल्यानंतर ( India-NZ ) रात्री सांगलीतल्या मिरजमध्ये तणाव निर्माण झाला होता. शहरातल्या लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले आणि जल्लोष साजरा करु लागले. याचवेळी येथे दुसरा गट दाखल झाला. काही तरुणांनी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
भारताने न्यूझीलंडवर मात केल्यानंतर मिरजमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याचं बघायला मिळालं. शेकडो तरुण रस्त्यावर येऊन जल्लोष करीत होते. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी झाल्याने दोन गट समोरासमोर आले आणि एकमेकांना आव्हान द्यायला लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन लाठीमार केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
टीम इंडिया चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकले आहे. भारताने रविवारी दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघाचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तरीही दोन्ही बाजूचे तरुण जल्लोष साजरा करीत होते. पोलिसांनी लाठीचार्ज करुन दोन्हीकडच्या लोकांना पांगवलं. त्यामुळे अनर्थ टळला. मिरजमध्ये अजूनही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
यापूर्वी भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होकी. भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तर गेल्या वर्षभरातील हे भारताचे एकूण दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. याआधी जून २०२४ मध्ये भारताने रोहितच्याच नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाच्या या विजयाचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत भारतीय संघाच्या यशाचे सेलीब्रेशन केले जात आहे. अशात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरही मागे राहिले नाहीत. ७५ वर्षीय गावसकरांनी चक्क लहान मुलांसारखा मैदानात ठेका धरला होता.