धक्काबुक्की अन् घोषणाबाजी, अकोल्यात योगेंद्र यादवांना भिडले वंचितचे कार्यकर्ते, जाणून घ्या नेमकं प्रकरण
Yogendra Yadav : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार घोषणा करण्यात येत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अकोल्यात स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
माहितीनुसार, स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव अकोल्यात आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या कार्यक्रमात त्यांना धक्काबुक्की करण्यात आली तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबद्दल योगेंद्र यादव यांनी X वर ट्विट करत माहिती दिली आहे.
त्यांनी X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, भारत जोडो अभियानाच्या 3 दिवसीय विदर्भ दौऱ्याअंतर्गत संविधान आणि आमचं व्होट या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जेव्हा मी भाषणाला सुरुवात केली तेव्हा अचानक मला बोलण्यापासून रोखण्यासाठी 40-50 लोकांचा जमाव स्टेजवर चढला आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा स्थानिक मित्रांनी आमचे संरक्षण करण्याचे प्रयत्न केले. पोलीस आल्यानंतरही त्यांच्याकडून तोडफोड सुरूच होती त्यामुळे पोलिसांनी आम्हाला तिथून बाहेर काढलं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज अकोला (महाराष्ट्र) में मुझ पर और भारत जोड़ो अभियान के साथियों पर जो हमला हुआ वह हर लोकतंत्रप्रेमी के लिए गंभीर चिंता का विषय है। भारत जोड़ो अभियान के विदर्भ दौरे के तहत हम “संविधान की रक्षा और हमारा वोट” विषय पर सम्मेलन कर रहे थे, तो मुझे बोलने से रोकने के लिए 40-50 लोगों की… pic.twitter.com/59wsdPWVob
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) October 21, 2024
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत, पण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही गंभीर विषय आहे. त्यामुळे जर मला अकोल्यात पुन्हा बोलावले तर मी नक्कीच पुन्हा येईन असेही ते म्हणाले.
शहरातील जिल्हा परिषद कर्म भवनातील सभागृहात भारत जोडो अभियाना अंतर्गत संविधान आणि आमचं व्होट या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात योगेंद्र यादव बोलत असताना काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर त्यांच्याकडून धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करण्यात आली.
ते एक बापाची औलाद नाही, ‘मविआ’ सोडणार का?, संजय राऊतांनी सगळं पिक्चरचं क्लियर करून टाकलं
माहितीनुसार, योगेंद्र यादव यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत योगेंद्र यादव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.