New Justice Statue : तलवार हटवली अन् संविधान नटवलं, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय 

  • Written By: Published:
New Justice Statue : तलवार हटवली अन् संविधान नटवलं, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय 

Chief Justice D. Y. Chandrachud : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice D. Y. Chandrachud) यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या (Justice Statue) डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे तसेच न्यायदेवतेच्या हातातून तलवार देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायदेवतेच्या एका हातात तलवारीच्या जागी संविधाना दिसणार आहे.

माहितीनुसार, न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.



माहितीनुसार, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या मते भारताने ब्रिटिश वारशातून पुढे जावे आणि कायदा कधीही आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे लेडी जस्टिसचे स्वरूप बदलायला हवे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

पुतळ्याच्या एका हातात तलवार नसून संविधान असावे, असे ते म्हणाले. जेणेकरून राज्यघटनेनुसार न्याय दिला जातो, असा संदेश देशाला जाईल. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, परंतु न्यायालये घटनात्मक कायद्यानुसार न्याय देतात.

‘शाहबाज शरीफ Thank You’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारताकडे रवाना

न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्याचा रंग पांढरा आहे. आता न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले असून न्यायदेवता साडीत दाखवली आहे. तसेच न्यायदेवतेच्या डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील आहे. याच बरोबर कपाळावर बिंदी, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात. तसेच नव्या पुतळ्यात न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube