सरकारला नमवलं, तो विजय तुमचा! ठाकरे बंधूंचं भावनिक निवेदन सोशल मीडियावर

सरकारला नमवलं, तो विजय तुमचा! ठाकरे बंधूंचं भावनिक निवेदन सोशल मीडियावर

Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय, असं निवेदनाद्वारे ठाकरे बंधूंनी (Uddhav Thackeray) म्हटलं आहे. ही माहिती खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) सोशल मीडियावर एक्स पोस्ट करत दिली आहे. Marathi Hindi Controversy

आवाज मराठीचा! असा बुलंद नारा देत, महाराष्ट्रातील जनतेने सरकारला नमवल्याचा जल्लोष आता राज्यभर सुरू आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाला मागे हटवायला भाग पाडणाऱ्या या ऐतिहासिक लढ्याचं श्रेय सर्वसामान्य मराठी जनतेला दिलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या या चळवळीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तसेच इतर अनेक पक्षांचा (Marathi Hindi Controversy) पाठिंबा लाभला. परंतु, राज ठाकरे यांनी एक निवेदन करत अत्यंत नम्रपणे आणि स्पष्ट शब्दांत म्हटलं की, सरकारला कोणी नमवलं, तर ते तुम्ही – मराठी जनतेने.

निवेदन केवळ घोषवाक्य नाही…

त्यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय की, आम्ही फक्त तुमच्या वतीने लढा दिला. हा विजय तुमचा आहे. 5 जुलैचा मेळावा हा आमचा नव्हे, तुमचा आहे. आम्ही आयोजक आहोत, जल्लोष करायचा तो तुम्ही. हे निवेदन केवळ एक घोषवाक्य नाही, (Maharashtra Politics) तर एका ऐतिहासिक संघर्षातील मराठी माणसाच्या सामूहिक एकजुटीचं प्रतीक आहे. त्यांनी पुढे म्हटलं, वाजत-गाजत या, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय.

‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न! राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती

5 जुलै रोजी होणारा विजयी मेळावा आता सर्वसामान्य मराठी भाषिकांसाठी सणासारखा ठरणार आहे. कोणताही पक्षीय झेंडा नसलेला, पण मराठी अस्मितेचा ठसा असलेला हा सोहळा इतिहास घडवणारा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय वाद, भाषिक सक्ती आणि जनतेच्या असंतोषातून उभ्या राहिलेल्या या चळवळीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, मराठी माणूस एकत्र आला, तर कोणत्याही निर्णयाला वळण देता येतं.

‘विजयी मेळाव्याची’ घोषणा

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय अखेर सरकारने मागे घेतला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या विरोधाच्या लाटेला सरकारने नमते घेतले. शिक्षण विभागाने संबंधित दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी 5 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली होती. याला उद्धव ठाकरे, शरद पवार गट, काँग्रेस यांचाही पाठिंबा लाभला. विरोधाचा जोर वाढताच सरकारने तातडीने याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती नेमली. अखेर 29 जून रोजी शासन निर्णय मागे घेण्यात आला.

उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं! योगेश कदमांचा राज ठाकरेंना टोला

या निर्णयानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चा रद्द करत ‘विजयी मेळाव्याची’ घोषणा केली. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं की, सरकारला कोणी नमवलं, तर ते मराठी जनतेने! हा निर्णय म्हणजे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या जनतेच्या एकजुटीचा विजय मानला जात आहे. आता 5 जुलैचा मेळावा हा जल्लोषाचा सोहळा ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube