उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं! योगेश कदमांचा राज ठाकरेंना टोला

उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं! योगेश कदमांचा राज ठाकरेंना टोला

Yogesh Kadam Hints To Raj Thackeray : बीड प्रकरण मनसेच्या आंदोलनांपासून ते राज्यभरातील राजकीय हालचालींवर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) स्पष्ट भूमिका मांडली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारची पहिल्यापासूनची भूमिका एकच आहे. राजकारण बाजूला ठेवून कठोर कारवाई. ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंकडे (Maharashtra Politics) जर काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत. कुणाही आरोपीला मोकळं सोडलं जाणार नाही.

त्याचबरोबर भास्कर जाधवांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी टोला लगावला की, नाराजी व्यक्त करून विरोधीपक्षनेतेपद मिळवता येत नाही. विरोधी पक्षात सरकारचा काहीही हस्तक्षेप नसतो.

शरद पवारांना पुन्हा धक्का! परभणीतील माजी आमदार अजितदादांच्या गटात; आजच करणार प्रवेश

स्वतःचं राजकीय अस्तित्व मिटवणं!

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संभाव्य जवळीकीच्या चर्चांवर थेट भाष्य करत योगेश कदम म्हणाले, मला वाटत नाही की राज ठाकरे उद्धवजींसोबत जातील. कारण उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं ही प्रतिक्रिया देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली असून, शिवसेना शिंदे गटाची भूमिका ठाम असल्याचं सूचित केलं आहे.

गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; कमर्शिअल गॅसचे जर 58 रुपयांनी घटले

मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, पण कायदा हातात नको. मनसे कार्यकर्त्यांकडून परराज्यीयांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत विचारले असता, योगेश कदम म्हणाले, मराठी-हिंदी वाद पुन्हा उफाळला आहे. मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही, मात्र कायदा हातात घेणं चुकीचं आहे. निवडणुका आल्या की काहींना अचानक मराठी आठवतं.

शिवसेनेचा विस्तार होणं स्वाभाविक

राज्यातील तसेच इतर राज्यांतील निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले, शिवसेना कुठे लढणार, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील. अनेक राज्यांत शिवसेनेची मागणी आहे. प्रत्येकाला वाटतं की, आपला पक्ष वाढावा, हे साहजिकच आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube