आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार?

आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार?

Assembly Session 2024 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होतये. (Assembly ) या आठवड्यात विधिमंडळात अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर केली जाणार आहेत. आज विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी नवनिर्वाचित शिक्षक आणि पदवीधरमधून निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. (Assembly Session) त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकीय ठरावही आज विधान परिषदेत ठेवला जाणार आहे. या ठरावात मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या स्थानकांची नावं बदलणार

  • करीरोड : लालबाग रेल्वे स्थानक
  • सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाचं नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव
  • पश्चिम मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
  • मरीन लाईन रेल्वे स्थानक : मुंबादेवी रेल्वे स्थानक
  • चर्नीरोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक
  • हार्बर मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
  • कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव : काळाचौकी रेल्वे स्थानक
  • डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे : माझगांव रेल्वे स्थानक
  • किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे : तीर्थकर पार्श्वनाथ स्थानक

 

स्मार्ट मीटरवरुन खडाजंगी शिक्षकांची मेगा भरती; ऑगस्टमध्ये 10,000 जागा भरणार,;झेडपीसह खासगी शांळांचा समावेश

मुंबईत विधान परिषदेत आज स्मार्ट मीटरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील 70 टक्के घरगुती आणि 30 टक्के उद्योगधंद्यासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मात्र, स्मार्ट मीटर लावल्यानं ग्राहकांना पाच पटीनं जास्त वीज बिल येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत आज लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे.

आजचं कामकाज  फ्रान्समध्ये त्रिशंकू परिस्थिती; डाव्या पक्षांचा मोठा विजय, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेल

राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच विधानसभेत आज एकूण 10 लक्षवेधीवर चर्चा होणार आहे. यामध्ये भांडुप येथील सुषमा स्वराज रुग्णालयात प्रस्तुतीवेळी झालेले वीज खंडितचे प्रकरण लक्षवेधी द्यावं चर्चिले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube