The Maharashtra Files : न्यायाच्या-संघर्षाच्या फाईल मागचं सत्य उलगडणार, ‘द महाराष्ट्र फाईल्स’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
The Maharashtra Files : “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित
The Maharashtra Files : “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठीच्या संघर्षाचे वास्तव चित्र उलगडणारा हा चित्रपट 29 मे 2026 पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आजकाल बरेचजण सरकारी यंत्रणांवर बोट दाखवतात, तर काहिजण याच सरकारी यंत्रणेच्या चुका लपवतात, त्यांना घाबरतात अशांना प्रेरित करणारा असा हा ट्रेलर असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि म्हणूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दाखविण्यात आलेली ही भारतातील पहिली फिल्म आहे.
ट्रेलरमध्ये न्यायासाठी झुंज देणाऱ्या एका स्त्रीची व्यथा, व्यवस्थेतील दडपशाही, तसेच संघर्षामागचं सत्य प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी असून हा चित्रपट सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा ठरणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य येत्या 29 मे 2026 पासून हा मोठ्या पडद्यावर उलगडेल. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.
गावची सेवा लोकांना मेवा हे आमचं ब्रीदवाक्य आहे!!
ट्रेलर आउट झालाय, तुम्ही पाहिलात का??
ट्रेलर पहा इथे – https://t.co/CsAWogox0Q
द महाराष्ट्र फाईल्स — २९ मे २०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!#TheMaharashtraFiles #MarathiMovie#InCinemas29May pic.twitter.com/2zVu1yKp3b
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 19, 2026
या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. येत्या 29 मे रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.