विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची सर्व 17 जागा लढवण्याची मोठी घोषणा

18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व 17 जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.

  • Written By: Published:
Untitled Design 105

The Mahavikas Aghadi is aggressive : राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला असून, येत्या 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. त्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल परब, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. बैठकीत विधान परिषद निवडणुकीसह राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीने निवडणुकीचा फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस 7 ते 8 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गट 5 ते 6 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 ते 4 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला नेमक्या कोणत्या जागा मिळणार याबाबतचा अंतिम निर्णय पुढील दोन ते तीन दिवसांत घेतला जाणार असून, 29 मे रोजी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनी लैंगिक अत्याचार प्रकरणात आसाराम दोषीच; हायकोर्टाने तातडीने आत्मसमर्पणाचे आदेश दिले

महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजीचा राजकीय फायदा उठवण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीच्या सर्व 17 जागा लढवणार आहे. आम्ही मित्रपक्षांसोबत सामंजस्याने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा प्रश्नावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळेच सरकारला दिल्लीला जावे लागल्याचा दावा त्यांनी केला. तर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही विधान परिषद निवडणुकीच्या संभाव्य सर्व 17 जागांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली.

follow us